300 किलोच्या अल्यूमिनीयम तारांची चोरी करणाऱ्या 3 आरोपीना बल्लारपूर पोलिसांनी केली अटक (Ballarpur police arrested 3 accused who stole 300 kg of aluminum wire)
बल्लारपूर :- दहेली येथील सिलवेल कॉर्पोरेशन प्रा.लि. येथून ३०० किलो अल्युमिनियम तार चोरून नेणाऱ्या ३ आरोपी सह भंगार विक्रेत्याला बल्लारपूर पोलीसांनी अटक केले. पोलीसांनी तपासचक्रे फिरवून घनश्याम ऊर्फ रोहन मारेश्वर आत्राम (२१) रा. जुनी दहेली, ता. बल्लारपुर, श्रवण ऊर्फ कल्लू शिवप्रसाद निषाद (२७) रा सरदार पटेल वार्ड, डब्ल्यू.सि.एल. कॉलरी कॅम्प बल्लारपुर या दोन आरोपीला अटक केले. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपीने ३०० किलो अल्युमिनियम तार भंगार विक्रेता फैजल नूर मोहम्मद मेमन (३०) रा. तुकूम तलाव उस्मानिया मस्जिद जवळ दुर्गापुर याला विकले. पोलीसांनी भंगार विक्रेता याला अटक करून अल्युमिनियम तार बाबत चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले. पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर करून तीन दिवसाची पोलीस कोठडी घेतले होते. त्यात अधिक चौकशी करत ३०० किलो तार ची वाहतूक केले मिनी मेटाडोर क्रं एमएच ३० बीडी ४२०५ किंमत अंदाजे १ लाख २० हजार व अल्युमिनियम तार ३०० किलो किंमत ६० हजार रुपये असे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सिलवेल कॉर्पोरेशन प्रा.लि दहेली येथून २७ नोव्हेंबर चा रात्री अज्ञात चोरांनी ३०० किलो अल्युमिनियम तार किंमत ६० हजार रुपये चोरून नेले होते. त्याची तक्रार सिलवेल कॉर्पोरेशन प्रा.लि दहेली चे सुपरवाइजर बाबुराव बालू वडतिया यांनी ६ डिसेंबर रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. पोलीसांनी अप क्रं १०९९/२०२४ कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून लगेच तपास सुरू केले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, महिला पोलीस अनिता नायडू आदींनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या