अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन (Applications are invited for Scheduled Tribe students for Class 1 admission in reputed residential schools of English medium to submit applications by 15th February.)

Vidyanshnewslive
By -
0
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली प्रवेशाकरीता अर्ज आमंत्रित 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन (Applications are invited for Scheduled Tribe students for Class 1 admission in reputed residential schools of English medium to submit applications by 15th February.)


चंद्रपूर :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता 23 डिसेंबरपासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहित कागदपत्रासह 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्विकारले जातील. अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र तसेच विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा. इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळेमध्ये करण्यात येणार नाही. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ आल्यास एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच करण्यात येईल. वरीलप्रमाणे प्रवेशाबाबतचे दाखले अर्जासोबत जोडून 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे निवड प्रक्रियेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समितीस राहील. शासनस्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजूर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईल. मंजूर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईल. इयत्ता 1 लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती 1. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2. विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी व प्रमाणपत्राची मुळप्रत तपासणीसाठी सोबत आणावी. 3. जर विद्यार्थ्याचे पालक दारिद्र्य रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल. प्रमाणपत्र जोडावे. 4. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष रु. इतकी असावी. 5. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दि. 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 6. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासननिर्णय/परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली करीता विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरण्यात येईल. या ठिकाणी आहेत प्रवेश अर्ज निशुल्क उपलब्ध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा स्टेडीयम मागे, सिव्हील लाईन, चंद्रपूर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा, शासकीय वस्तीगृह, एकलव्य रेसिडेंशियल स्कुल, देवाडा या ठिकाणी प्रवेश अर्ज नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)