बल्लारशाह वनपरीक्षेत्राच्या कळमना उपक्षेत्रात विविध कार्यक्रमाद्वारे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन (Organized Wildlife Week through various programs in Kalmana Sub-Zion of Ballarshah Forest Park)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह वनपरीक्षेत्राच्या कळमना उपक्षेत्रात विविध कार्यक्रमाद्वारे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन (Organized Wildlife Week through various programs in Kalmana Sub-Zion of Ballarshah Forest Park)


बल्लारपूर :- ७ ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताहाचे समारोप कर्मवीर विद्यालय येनबोडी चे १० वी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता मानव व वन्यजीव संघर्ष ह्यावर उपाययोजना या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच संतोष कुंदोजवार, सामाजीक कार्यकर्ता यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर सविस्तर माहीती देवून विद्यार्थ्यांना प्रत्याक्षीक करून दाखविले. कार्यक्रमात उत्कृष्ठ निबंध ला पुरस्कार देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कु. मानसी दिपक ताजने, द्वितीय क्रमांक आदित्य चिंधुजी गुरनुले, तृतीय तुषार सोमेश मडावी यांना देण्यात आले. बी. टी. पुरी, क्षेत्र सहाय्यक यांनी वन्यजीव विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बल्लारशाह वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कळमना उपक्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कळमना नियत क्षेत्रातील कक्ष ५७० मध्ये श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला. समितीचे अध्यक्ष, गावकरी यांना वनात भ्रमंती करण्यात आले. व विविध झाडांचे प्रजाती व औषधी वनस्पती यांची ओळख करून देण्यात आले. सदर कार्यक्रम नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह सांचे मार्गदर्शनात कळमना चे क्षेत्र सहाय्यक बी.टी.पुरी, वनरक्षक एस पी. नन्नावरे, कु. बी. पी. तिवाडे तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समीतीचे अध्यक्षा शेखलाल शेख कळमना, संदीप कोठारे पळसगाव, आबाजी सोयाम कोर्टीमक्ता, गणेश टोंगे सरपंच कोर्टीमक्ता, प्रकाश कांबळे कळमना सह गावकरी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)