बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू विविध खेळांमध्ये चमकले. जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मुजाहिद खानने पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान प्राप्त केले असून कु.सिमरन खोब्रागडे ने 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्येर द्वितीय स्थान प्राप्त केले. आणि विभाग स्तरावर आपले नाव नोंदविले.
त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू शादाब शेख याच्या नेतृत्वामध्ये कबड्डीच्या संघाने चतुर्थ स्थान प्राप्त केले आहे .गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालय कबड्डी स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अशा प्रकारे वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी.डी.चव्हाण व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.94217117068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या