बल्लारपूर पोलीसांची कारवाई, घातक हत्यारांचा साठ्यांसाह 2 आरोपीना अटक केली (Action of Ballarpur police, 2 accused arrested along with stock of dangerous weapons)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलीसांची कारवाई, घातक हत्यारांचा साठ्यांसाह 2 आरोपीना अटक केली (Action of Ballarpur police, 2 accused arrested along with stock of dangerous weapons)


बल्लारपूर :- ऐन सण उत्सवाच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे मागील काही दिवसात बल्लारपूर शहरातून कमी अधिक प्रमाणात तलवारी व शस्त्र जप्त करण्यात आली असून नवरात्र व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ऍक्शन मोड वर आली असून धडक कारवाई करीत शस्त्र साठा सहित दोन आरोपींना काल रात्रीच्या सुमारास अटक केली. बल्लारपूर पोलीसांना बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारावर आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी कायदेशिर क्रिया रितीप्रमाणे घरझडती घेतली असता एकुण ६ लोखंडी तलवार, १ भाला व १ कुकरी असा घातक हत्यारांचा साठा घटनास्थळा वरून जप्ती केले. पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क ९४५/२०२४, कलम ४, २५ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाहीत एकुण दोन आरोपी नामे प्रमोद श्रीहरी बरडे वय ५८ वर्षे, आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे, वय ३० वर्ष, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर या दोन व्यक्तींना यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू असून सदर ची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, पोलीस उपनिरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार वामन शेंडे, भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंदार, विना एलकुलवार, इत्याद्दी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)