तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित, 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन (Proposals invited from social workers for Grievance Redressal Committee, applications invited by October 15)

Vidyanshnewslive
By -
0
तक्रार निवारण समितीकरीता सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव आमंत्रित, 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन (Proposals invited from social workers for Grievance Redressal Committee, applications invited by October 15)


चंद्रपूर :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 तसेच महिला व बाल विकास विभागाचे दि. 11 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार, चंद्रपूर जिल्ह्याकरीता स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावयाची आहे. यासाठी अहर्ता प्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या महिलांमधून नामनिर्देशनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. तर दोन सदस्य पदासाठी महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेल्या व्यक्तीमधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल व त्यापैकी एक महिला राहील. परंतु, त्यापैकी किमान नामनिर्देशित सदस्याची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. तसेच, त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा इतर मागासवर्ग अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. अर्हता धारक सामाजिक कार्यकर्त्यांनी परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना बंगला, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर या कार्यालयात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)