चंद्रपूर :- शालेय टीसी वर बौद्ध नमूद असलेले विद्यार्थी अनुसूचित जातीत मोडत नाहीत, असा नवीन जावई शोध प्रवेश नियमक प्राधिकरण समितीने लावला असून, या मुळे राज्यात नव्या वादाला तोड फुटले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व आपल्या लाखो बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन जनावरां पेक्षाही हीन वागणूक मिळत असलेल्या महार समुदायाला माणुसपण बहाल केले...त्यानंतर मोठी समाजिक क्रांती झाली. शैक्षणिक क्षेत्रात तर बौद्धांनी चमत्कारिक यश संपादन केले. आणी बाबासाहेबांचा सन्मान म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शालेय टीसी वर महार या जातीच्या ठिकाणी 'बौद्ध' म्हणून नमूद केले. अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्या साठी 1950 च्या पुराव्यांची अट असल्याने टीसी वर जरी 'बौद्ध' नमूद असले तरी पुरावे हे महार जातीचेच जोडल्या जात असल्याने जात प्रमाणपत्र हे महार जातीचेच बनवल्या गेले. त्यामुळे जात वैद्यता प्रमाणपत्रही महार म्हणूनच देण्यात आले.बौद्ध आणी नवबौद्ध हे अनुसूचित जातीत 37 नंबर वर येत असल्याचे महाराष्ट्र आणी केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही टीसी वर बौद्ध आणी जात प्रमाणपत्र तथा जात वैद्यता प्रमाणपत्र महार असल्याच्या सबबी खाली प्रवेश नियमक प्राधिकरण समिती मुंबईच्या अध्यक्ष आणी सचिवाने टीसी वर बौद्ध नमूद आहे म्हणून डॉ.सौ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूरच्या कु. श्रेया नवशत्रू तांबेकर या विद्यार्थिनीचा प्रवेश नाकारण्याचे पत्र महाविद्यालयाला दिले आहे. या पत्रा मुळे एकच खळबळ उडाली असून, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असूनही टीसी वर बौद्ध असणाऱ्या विद्यार्थ्यी आणी पालकांना थरकाप सुटला आहे. राज्यात टीसी वर बौद्ध नमूद असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात असून, या समितीला जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचे नसून टीसी वरील बौद्ध नमूद असलेले खटकत आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
या संबंधाने पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी प्रवेश नियमक प्राधिकरण समिती, मुंबई यांना निवेदन देऊन समितीने बौद्ध समातील विद्यार्थ्यावरील आकस पूर्ण दुर्व्यवहार त्वरित थांबविण्याची विनंती केली आहे. दरम्यान समितीच्या या आकसपूर्ण धोरणामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, होत आहे...समितीने शासन निर्णया प्रमाणे बौद्ध, नवबौद्ध विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीत गृहीत धरून आपले जातीयवादी धोरण तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात समितीच्या जातीयवादी धोरणा विरुद्ध तीव्र आंदोलन उभारले जाईल तथा समितीतील अध्यक्ष आणी सचिवावर अनुसूचित जाती, जमाती अन्याय अत्याचार निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करू, असेही निवेदनातून स्पष्ट केले आहे. दरम्यान टीसी वर बौद्ध नमूद असलेले विद्यार्थी अनुसूचित जातीत मोडत नाही, असा नवीन जावई शोध समितीने लावला असून, यामुळे मेडिकल, इंजिनियर करणाऱ्या लाखो बौद्ध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी टांगल्या गेले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या