चंद्रपूर जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ (Inauguration of Acharya Chanakya Skill Development Center in 24 Colleges of Chandrapur District)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ (Inauguration of Acharya Chanakya Skill Development Center in 24 Colleges of Chandrapur District)


चंद्रपूर :- राज्यातील नामंकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापन करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे  हस्ते  दि. 20 सप्टेंबर रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, नियामक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वाशिमकर, समन्वयक डॉ. गणेश चव्हाण तसेच अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आले असून या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण 150 युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात 15 ते 45 वयोगटातील दरवर्षी साधारण 1 लाख 50 हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे. ही आहेत जिल्ह्यातील महाविद्यालये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे जिल्ह्यातील 24 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू झाले आहे.

 
             या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात ‍1. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, 2. निलकंठराव शिंदे सायन्स ॲन्ड आर्ट कॉलेज भद्रावती, 3. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रम्हपुरी, 4. डॉ. ज्ञानरत्न ‍सिव्हिल सर्विस कॉलेज भद्रावती, 5. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज चंद्रपूर, 6. गुरुसाई पॉलिटेक्निक कॉलेज चंद्रपूर, 7. चिंतामणी कला व विज्ञान कॉलेज गोंडपिंपरी, 8. श्री ज्ञानेश महाविद्यालय सिंदेवाही, 9. रामचंद्रराव धोटे कला व वाणिज्य महाविद्यालय राजुरा, 10. राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर, 11. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, 12. शुरवी महिला महाविद्यालय मुल, 13. श्री. साई आयटीआय भद्रावती, 14. डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स चंद्रपूर, 15. स्व. गोपालराव वानखडे जुनियर कॉलेज बल्लारपूर, 16. मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी घोडपेठ, ता. भद्रावती, 17. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी. फार्म ब्रम्हपुरी, 18. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजनियरींग रिसर्च ॲण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर, 19. अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चंद्रपूर, 20. अशोका नर्सिंग कॉलेज चंद्रपूर, 21. सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामणी बल्लारपुर, 22. प्रभादेवी स्कुल ऑफ नर्सिंग चंद्रपूर, 23. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॅालेटेक्नीक कॉलेज बेटाळा ब्रम्हपुरी, आणि महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट (डी फार्म)अशा एकूण 24 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रामधून कौशल्य विकासाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)