स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरातून जिवंत काडतूस आणि अमली पदार्थासह 2 आरोपीना अटक (Action by local crime branch, 2 accused arrested with live cartridge and drugs from Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरातून जिवंत काडतूस आणि अमली पदार्थासह 2 आरोपीना अटक (Action by local crime branch, 2 accused arrested with live cartridge and drugs from Ballarpur)


चंद्रपूर :- बल्लारपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक महत्त्वाची कारवाई करून जिवंत काडतूस व अमली पदार्थांच्या अंशांचे कागदांसह दोन आरोपींना अटक केली आहे. २४ सप्टेंबर २०२४ ला स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बल्लारपूरच्या डॉ. झाकीर हुसैन वॉर्डमध्ये एका दुचाकीवरील दोघे व्यक्ती अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगून अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. या माहितीच्या आधारे, पथकाने रात्री ८.४५ च्या सुमारास मोपेड (सुझुकी ॲक्सेस क्रं एमएच ३४ सीजी २२९९) ची तपासणी केली. या दरम्यान, दुचाकीतून दोन जिवंत काडतूस, लायटर, सिल्व्हर रंगाचा गोगो पेपर, अर्धवट जळलेला सिल्व्हर पेपर आणि ४० कागदी चिटारे मिळाल्या. या अनुषंगाने पोलिसांनी डॉ. झाकीर हुसैन वॉर्ड बल्लारपूर येथून 1 आणि महाराणा प्रताप वॉर्ड दत्त मंदिर परिसर येथून 1 अशा 2 आरोपीना ताब्यात घेतले. या कारवाईत ७१ हजार ०१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपींवर भारतीय हत्यार कायद्यानुसार व एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी केले, तर पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथकाने कामगिरी पार पडली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)