आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या चंद्रपूरच्या नर्ससह 15 परिचारिकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान (15 nurses including Asha Bawan of Chandrapur for their selfless service in the health sector were honored with the National Florence Nightingale Award by President Draupadi Murmu.)
चंद्रपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा मुंबईत गौरव करण्यात आला. सुश्री आशा बावणे यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या टीकाकरण मोहिमेचे विशेष कौतूक झाले असून त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे त्या अनेक आरोग्य सेवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. या सोहळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील सार्वजनिक आरोग्य परिचारीका सुश्री आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 पासून सुरू झाले असून वर्ष 2023 पर्यंत 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री अनुप्रिया पटेल, आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या