बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने लावारी येथील एमीनन्स स्पायसेस कंपनी ला औद्योगिक भेट देण्यात आली. सदर कंपनी चे व्यवस्थापक श्री. अहेमद यांनी विद्यार्थ्यांना मसाले तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्याची बांधणी कशी केली जाते, त्याचे विपणन कशा पद्धतीने केली जाते, वस्तूची किंमत कशी ठरवायची व स्पर्धकांच्या तुलनेत आपली वस्तू योग्य दर्जेची कशी बनवायाची व मसाल्याशी संबंधीत बरीच अशी मौलिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदर औद्योगिक भेटीचे आयोजन वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. रोशन फुलकर व प्रा. डॉ. विनय कवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या