महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग (National Sports Day was celebrated in Mahatma Phule College, students participated in various competitions)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग (National Sports Day was celebrated in Mahatma Phule College, students participated in various competitions)
बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर मध्ये २९ऑगस्ट २०२४ ला हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालमुकुंद कायरकर क्रीडा व शारीरिक विभाग प्रमुख यांनी केले या निमित्ताने महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील खेळांचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये लिंबू चमचा, लगोरी, पोत्यांची रेस, कंचे, विटी दांडू, हळूवार सायकल चालवणे, गुलेल ची शूटिंग अशा प्रकारचे अनेक खेळांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग तर घेतलाच शिवाय महाविद्यालयीन प्राध्यापक या खेळाशी एकरूप होताना दिसलें ग्रामीण भागातील खेळ आता दिसेनासे झालेले आहे त्यामुळे खेळाडूंमध्ये एकत्वाची भावना निर्माण होते. या खेळाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागचे प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळांमध्ये सहभाग घेतला. अशाच प्रकारच्या खेळाचे आयोजन नेहमी होत राहावे असे विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)