धक्कादायक ! पत्नीने केली पतीची हत्या, नांदगाव पोडे येथील घटना (Shocking! Wife kills husband, incident at Nandgaon Pode)
बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे बुधवार (दि.१७) रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पती चे नाव अमोल मंगल पोडे (वय ३८) रा.नांदगाव पोडे ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर असे आहे. मृतक अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश अमोल पोडे (११) आणि सारंग अमोल पोडे (८) सोबत राहत होते. मात्र अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले.यामुळे पती पत्नीत नेहमीच वाद होत होता.दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आभाळ होत होती. यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमी प्रमाणे काल बुधवारी अमोल घरी मध्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नी लक्ष्मी सोबत वाद घातला. उभयतात कडाक्याचे भांडण झाले. तिने सततच्या जाचाला कंटाळून पती अमोलला संपविण्याच्या कट केला. दोन्ही मुले व लक्ष्मीची आई झोपी गेले. ही संधी साधून लक्ष्मीने कडक लक्ष्मीचा अवतार धारण केला. कोंबड्याच्या कातीने, धारदार शस्त्राने अमोलचा गळा चिरून त्याला यमसदणी धाडले. रक्ताच्या थरोळ्यात तो मृत झाला. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे पतीच्या निर्घून हत्येची माहिती स्वतः लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. अमोलचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत. घटनेतील आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे (वय 35) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. बल्लारपूर तालुक्यात नांदगाव (पोडे) गाव ५ हजारावर लोकसंख्येचे आहे. या गावात पतिपत्निच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आज गुरुवारी सकाळी ७ वाजता उघडीला आल्यावर घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या