भारतीय रेल्वेत निवड झाल्याबद्दल संकेत परिष मेश्राम यांचा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सत्कार (Sanket Parish Meshram felicitated at Mahatma Jyotiba Phule College for getting selected in Indian Railways)

Vidyanshnewslive
By -
0
भारतीय रेल्वेत निवड झाल्याबद्दल संकेत परिष मेश्राम यांचा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात सत्कार (Sanket Parish Meshram felicitated at Mahatma Jyotiba Phule College for getting selected in Indian Railways)


बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानीय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय चा विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचा सत्कार करण्यात आले. संकेत मेश्राम हा दिव्यांग असून त्यांनी कठोर अभ्यास करून भारतीय रेल्वेत नोकरी मिळवली. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याला महाविद्यालयातील चरित्र दाखल्याची आवश्यकता असल्यामुळे तो १५ जुलै ला महाविद्यालयात गेला होता. संकेतच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांना माहिती कळली असता त्याचा सत्कार करण्यात आले. विशेष म्हणजे संकेत चे शिक्षण अकरावी पासून पदव्युत्तर शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात झाले आहे. प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांनी दिव्यांग विद्यार्थी संकेत पारिष मेश्राम याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. या वेळी प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा.डॉ. विनय कवाडे, लिपिक प्रकाश मेश्राम, अशोक गर्गेलवार आणि संकेत चे वडील पारिष मेश्राम तसेच महाविद्यालयाचे सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)