महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " एक पेड मा के नाम " अंतर्गत वृक्षारोपण (Plantation under "Ek Ped Ma Ke Naam" on behalf of National Service Scheme Department of Mahatma Phule College Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने " एक पेड मा के नाम " या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी " एक पेड मा के नाम " अंतर्गत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले यनिमित्ताने विविध प्रकारच्या फुलांची व फळांची रोपटे लावण्यात आली.

           यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी जुनघरे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चौरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा.शुभांगी भेंडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)