फॉरेस्ट डेपोत एका व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या (A person committed suicide by hanging himself in Forest Depot)

Vidyanshnewslive
By -
0
फॉरेस्ट डेपोत एका व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या (A person committed suicide by hanging himself in Forest Depot)
बल्लारपूर :- वाहतूक विपणन वनविभाग चा परिसरात एका ५५ वर्षीय इसमाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव अशोक बापूराव वांढरे वय ५५ वर्ष रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर आहे. वाहतूक विपणन वनविभाग चा भामरागड आगारातील प्लॉट क्रमांक ४ येथे कर्मचारी गस्त करत असताना त्यांना झाडाला एका इसमाने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी लगेच वी. डी. पवार वनपाल यांना माहिती दिली. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती वरिष्ठांना दिली. तसेच पोलीस विभागाला तक्रार दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधाकर गुरूनुले करत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)