चंद्रपूर-मूल मार्गांवरील चिचपल्ली येथील तलाव फुटले, गावात पाणीच पाणी, प्रशासनाचे मदतकार्य सूरू (The lake at Chichapalli on the Chandrapur-Mul routes burst, water is water in the village, the relief work of the administration has started)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर-मूल मार्गांवरील चिचपल्ली येथील तलाव फुटले, गावात पाणीच पाणी, प्रशासनाचे मदतकार्य सूरू (The lake at Chichapalli on the Chandrapur-Mul routes burst, water is water in the village, the relief work of the administration has started)


चंद्रपूर -: चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर-मूल मार्गांवरील चिचपल्ली गावातील तलाव फुटल्याने तलावातील पाणी आज दिनांक 21 जुलै सकाळी 5 वाजता गावात शिरले, आणी झोपेत असलेल्या गावाकऱ्यांचा एकच हाहाकार माजला. चिचपल्ली गाव साधारण 400 घरांच्या वस्तीचा गाव असून तलाव फुटी मुळे गावातील 100 ते दीडशे घरात पाणी शिरले, लोकांनी स्लॅब वर चढून आधार घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मागील तीन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे तालावाचे पाणी वाढले आणी अचानक झालेल्या तलाव फुटी मुळे गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, यामुळे गावकऱ्यांची आपआपले जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली. घरातील अन्नधान्य, उपकरने, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार चंद्रपूर तसेच प्रशासन आपल्या पथकासह चिचपल्ली गावात पोहचले असून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरु आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा आषाढी च्या दिवशीच 2010 मध्ये अशीच पूर परिस्थिती या गावात निर्माण झाली होती त्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर तेही आषाढी च्या दिवशीच म्हणजे आज 21 जुलै 2024 रोजी पुन्हा गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)