निरपराध कुटुंबियांचे पोलिसांच्या जाचापासून सुटका करावी - संतोषकुमार रामसरण गुप्ता, पत्रकार परिषदेतून आरोप (Innocent families should be freed from police interrogation - Santoshkumar Ramsaran Gupta, allegations from a press conference)

Vidyanshnewslive
By -
0

निरपराध कुटुंबियांचे पोलिसांच्या जाचापासून सुटका करावी - संतोषकुमार रामसरण गुप्ता, पत्रकार परिषदेतून आरोप (Innocent families should be freed from police interrogation - Santoshkumar Ramsaran Gupta, allegations from a press conference)


बल्लारपूर :- दि. ७/७/२०२४ ला गांधी चौक मालू वस्त्र भंडार येथे कोणी अज्ञात तीन व्यक्तीने पेट्रोल बाम्ब टाकले व त्याच्या नौकराला मारहाण केली. त्याच दिवशी सकाळी संशयावरून कि अर्जदाराचा मुलगा सुरज गुप्ता यांनी हे सर्व घडवून आणले असे गृहीत धरून अर्जदाराला व त्याचा सर्व परिवारातील ८ लोकांना व दुकानाच्या नोकराला सूचित देरकर व एका मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बोलाविले व रात्री पर्यत बसवून ठेवले व त्यादिवशीपासून आज पर्यत दररोज सकाळी १० वाजेपासून रात्री ८-९ वाजेपर्यत पोलीस स्टेशनला बोलवून बसवून ठेवत आहेत. अर्जदारावर किवा इतर लोकावर गुन्हा दाखल नाही तसेच त्यांना कोणतीही नोटीस दिली नाही. दि. १४/०७/२०२४ ला सुद्धा अर्जदार व इतर लोकांना सकाळी पोलीस स्टेशन मध्ये बोलाविले दुपारी वेळेस पोलीस निरीक्षक यांनी डी बी रूम मधून वेगळ्या रूम मध्ये घेऊन गेले व दोन पोलीसानी अर्जदाराला पकडून ठेवले व पोलीस निरीक्षक अर्जदाराला पोलीसच्या डडाने बेदम व निर्दयीपणे मारले तसेच दोन्ही हातावर डडाने मारले व जमिनीवर पटकून मारल्यामुळे एका हाताची हड्‌डी तुटली व दुसरा हाथाला जबरदस्त भार लागला तसेच अर्जदाराला अश्लील भाषेत शिव्या दिल्या म्हणून धमकी दिली अर्जदाराला चक्कर येत होती तरी पोलीस निरीक्षक यांना दया आली नाही. रात्री पर्यत पुन्हा बसवून त्रास दिला. त्यानंतर सोडून दिले.
           अर्जदाराच्या पत्नीने अर्जदाराला रात्री ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे घेऊन गेली तर डॉक्टरनी चंद्रपूरच्या दवाखान्यात पाठविले. तेथे रात्री २- वाजेपर्यत थाबले. व घरी परत आले. दि. १५/७/२०२४ ला सकाळी रुग्णालयात जात असताना, दवाखान्यात जाऊ न देता पोलीस स्टेशन मध्ये बोलाविले. अंदाजे ११ वाजता अर्जदार चक्कर येऊन पडले तेव्हा पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. दवाखान्यातील x-rey मशीन नादुरुस्त असल्यामुळे डॉक्टरनी कच्चे पास्टर करून दिले. काल रात्रीपर्यत खूपच चक्कर येत होती व बोलण्याची स्थिती नसल्यामुळे व मानसिक आघातामुळे रिपोर्ट देऊ. शकलो नाही म्हणून आज रिपोर्ट देत आहे. पोलीस निरीक्षक अर्जदाराला व त्याचे परिवारातील लोकांना बोलाविले या बाबत तसेच अर्जादारला चक्कर आली. तेव्हा समोरच्या बेंचवर आणून झोपविले याबाबत cctv मध्ये रेकॉर्ड झालेले आह. संबधित वरील कृत्य हे बेकायेशीर व अवैध आहे हे कृत्य करणे हे पोलिसांना दिलेल्या अधिकारात मोडत नाही व लोकांना मारहाण करणे कोंडून ठेवणे हे त्यांच्या official duty मध्ये येत नाही म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला उपलब्ध असलेले परवानगीची तरतूद गैरअर्जदाराला लागू होत नाही करिता पोलीस निरीक्षक भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम २९६, ११८ (२), ३५१ (२) व (३), १२७ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावा. अशी मागणी संतोष गुप्ता यांनी पत्रकार परिषदेतून केली या पत्रकार परिषदेला त्यांच्या पत्नी रेखा गुप्ता, ऍड मेघा भाले उपस्थित होत्या तसेच योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्यात यावा. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता सर्व आरोप फेटाळले असून कोणतीही मारहाण झाली नसून संशयांच्या आधारावर कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलाविले व तपास केला लवकरच पेट्रोल बॉम्ब प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)