तख्तापलट.....!, शि.प्र.मंडळाचे अध्यक्षपदी ऍड.अनिल वैरागडे, सचिवपदी शशिकांत धर्माधिकारी, अजय वासाडे पराभूत. Coup...., (Adv. Anil Vairagade as President of S.P. Mandal, (Mul) Shashikant Dharmadhikari as Secretary, Ajay Vasade defeated.)

Vidyanshnewslive
By -
0
तख्तापलट.....!, शि.प्र.मंडळाचे अध्यक्षपदी ऍड.अनिल वैरागडे, सचिवपदी शशिकांत धर्माधिकारी, अजय वासाडे पराभूत. Coup...., (Adv. Anil Vairagade as President of S.P. Mandal, (Mul) Shashikant Dharmadhikari as Secretary, Ajay Vasade defeated.)


मूल :- दलितमित्र, माजी खासदार स्व. वि.तु.नागपूरे उपाख्य वकीलसाहेब संस्थापीत नामांकीत शि.प्र. मंडळ मूलच्या कार्यकारिणी निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड.अनिल वैरागडे यांची अविरोध निवड तर सचिव पदाकरीता
झालेल्या निवडणूकीत शशिकांत धर्माधिकारी यांनी वासाडे गटाचे अजय वासाडे यांचा पराभव करून विजय मिळविला आहे. उपाध्यक्ष पदी ऍड.प्रणव वैरागडे, अजय वासाडे तर सहसचिवपदी ते.क.कापगते यांची अविरोध निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार धर्मदाय आयुक्त यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक घेतली व कार्यकारिणी जाहीर केली.
          गत २६ वर्षापासून शिक्षण प्रसारक मंडळात् अंतर्गत वाद व दीर्घकाल न्यायालयीन लढाई सुरू होती. या काळात ऍड.बाबासाहेब वासाडे यांनी एकहाती संस्था सांभाळली होती. संस्थेतंगत वाद सवौच्च न्यायालयात गेला होता. दीर्घकाल लढ्यानंतर अखेर सवौच्च न्यायालयाने २३-१-२०२४ ला अंतीम निर्णय देत ६ महिण्यात निवडणूक घेऊन कार्यकारिणी गठीत करण्याचे आदेश दिले होते. यानुसार १७-७-२०२४ ला धर्मदाय आयुक्त यांनी निवडणूक घेतली १४ सदस्य संख्या असलेल्या कार्यकारिणीत दोन गट पडले. यात ४ सदस्य अनुपस्थित राहिल्याने व वासाडे गट अल्पमतात आला. अजय वासाडे यांनी सचिव पदाकरीता अर्ज दाखल केला तर दुसऱ्या गटाकडून शशिकांत धर्माधिकारी यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने अखेर निवडणूक होऊन धर्माधिकारी ८ विरुध्द् ४ मतांनी विजयी तर वासाडे पराभूत झाले  शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या हातात ठेवण्याकरीता वासाडे गटाने मोठे प्रयत्न केले मात्र अखेर सत्तांतर होऊन सूत्रे ऍड.अनिल वैरागडे यांचेकडे गेली. शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत मुल, सावली तालुक्यात अनेक शाळा, कनिष्ट महाविदयालये, वस्तीग्रुह व मूल येथे सुसज्ज महाविद्यालय पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आहे. या संस्थेत १५० चे आसपास कर्मचारी कार्यरत आहेत हे विशेष. निवड झाल्यानंतर संस्थेतंगत शाळा, महाविदयालयांना अधिकाधिक सुसज्ज करण्याचा मानस अध्यक्षपदी अनिल वैरागडे व सचिव शशिकांत धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
           नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव शिक्षण प्रसारक मंडळात सत्तांतर होऊन अध्यक्षपदी ऍड.अनिल वैरागडे, सचिवपदी शशिकांत धर्माधिकारी, उपाध्यक्षपदी ऍड.प्रणव वैरागडे यांची निवड झाल्याने आनंदाचे वातावरन तयार झाले असून सर्वत्र अभिनंदन होत आहे. कर्मवीर महाविद्यालयांच्या प्राचार्या श्रीमती कऱ्हाडे, प्राचार्य अशोक झाडें, प्र. प्राचार्य भगत, मुख्याध्यापीका श्रीमती राजमलवार, पतसंस्थेचे संचालक गुरूदास चौधरी, दिनेश जिददीवार, सचिव श्री.नौकरकर, संचालक मिलींद रामटेके, कन्या विद्यालयाचे सुपरव्हायजर श्री. बारसागडे , न.भा.कनिष्ट विद्यालयाचे प्रा. प्रभाकर धोटे यांचेसह अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, मुल शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी अभिनंदन केले आहे. राज्य मराठी पत्रकार संघाचे विदभं विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे, प्रेस क्लब चे मार्गदर्शक विजय सिद्धावर, राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश राजुरवार यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)