मृत अनोळखी व्यक्तीचे ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Ballarpur Police appeal for identification of dead unidentified person)

Vidyanshnewslive
By -
0
मृत अनोळखी व्यक्तीचे ओळख पटविण्याचे बल्लारपूर पोलिसांचे आवाहन (Ballarpur Police appeal for identification of dead unidentified person)


बल्लारपूर :- पोस्टे बल्लारपूर येथे आज दिनांक 03/07/24 रोजी पोशी सौरभ मुन यांनी फिर्याद दीली कि, बल्लारपूर शहरातील नगर परीषद चौकात पिंपळाचे झाडाखाली एक अंदाजे 35 - 40 वर्षांचा अनोळखी पुरूष, अंदाजे 5.4 फुट उंचीचा, सावळ्या रंगाचा, सडपातळ बाधां, अंगात ग्रे कलरचे हाफ टी शर्ट व निळ्या रंगाचा ट्रक पॅंट असलेला, नगरपरिषद चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे मागील बाजूस पीपंळाचे झाडाखाली मृतावस्थेत पडून आहे. सदर मृतक हा या परीसरात १५ दिवसापासून फिरत होता. व या परीसरातील तसेच शहरातील कचरा वेचत होता. तो गेल्या 05-06 दीवसापासुन आजारी होता व सरकारी दवाखान्यात उपचार घेत होता. तो आज कसल्यातरी आजाराने मरण पावला आहे. तरी  मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे व पोलीस  विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन असिफराजा शेख पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी केले या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे अशी माहिती सपोनि प्रविण तळी पोस्टे बल्लारपूर यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)