भारत सरकार प्रगती शिष्यवृत्ती योजना.शासकिय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या नऊ गुणवंताना प्रत्येकी 50 हजार रकमेची शिष्यवृती. (Government of India Pragati Scholarship Scheme. 50,000 scholarship each for the nine merits of Government Tannariketan Bramhapuri.)

Vidyanshnewslive
By -
0
भारत सरकार प्रगती शिष्यवृत्ती योजना.
शासकिय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या नऊ गुणवंताना प्रत्येकी 50 हजार रकमेची शिष्यवृती. (Government of India Pragati Scholarship Scheme. 50,000 scholarship each for the nine merits of Government Tannariketan Bramhapuri.)
ब्रम्हपुरी: येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत शिकत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांना ‘भारत सरकारच्या प्रगती व स्वनाथ शिष्यवृत्या’ गुणवत्तेच्या निकषावर नुकत्याच जाहीर झाल्या आहे. ‘प्रगती शिष्यवृत्ती’ ही ‘तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण’ या उद्देशाने तंत्रशिक्षण पदविका तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या गुणवंत मुलींना तसेच ‘स्वनाथ शिष्यवृत्ती’ ही पितृछत्र हरवलेल्या गुणवंत मुला-मुलींना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्फत गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातात. शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी सिव्हील इंजिनीअरिंगमधून कु. प्रणयी बनपुरकर व कु. श्रुती पुंडलिक उंदीरवाडे, कॉम्पुटर टेक्नोलॉजीमधून कु. प्रतिक्षा विकास नाकतोडे, कु. श्रेया रामदास राऊत, कु. शिवानी नारायण बुल्ले, कु. श्रेया ज्ञानेश्वर काटलाम तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधून कु. श्रुंखल हंसराज सैजारे यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची प्रगती शिष्यवृत्ती आणि कॉम्पुटर टेक्नोलॉजी मधून पार्थ किशोर बांते आणि आयुष लांबट यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची स्वनाथ शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्त्या पदविकेच्या तीनही वर्षासाठी मिळतात. यासाठी प्रत्येक वर्षी अर्ज सादर करावा लागतो. सदर शिष्यवृत्तीकरिता संस्थेचे माजी प्र. प्राचार्य डॉ. सुरेंद्र कुकडपवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मीनल मून यांनी समन्वय साधला. या यशाकरिता सदर विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्र. प्राचार्य डॉ. राजन वानखडे, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र राचलवार यांच्यासह विभागप्रमुख प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. जानराव केसकर, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोरलीकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)