लांब पल्ल्याच्या 46 रेल्वे गाड्यामध्ये लागणार अतिरिक्त जनरल बोगी, सेवाग्राम एक्सप्रेस व जयपूर-मैसूर एक्सप्रेस मध्येही असणार बोगी (46 long distance trains will have additional general coaches, Sevagram Express and Jaipur-Mysore Express will also have coaches.)

Vidyanshnewslive
By -
0

नागपूर :- लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना होणाऱ्या अडचणी पाहता भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी ४६ गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल बोगी लावण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती देताना असे म्हंटले आहे की, सामान्य श्रेणीतील गाड्यांमध्ये 92 नवीन डबे बसवण्यात आले असून, डब्यांची संख्या वाढवण्यासाठी 22 इतर ट्रेन्सचेही समावेश केला असून आणि जनरलचे अतिरिक्त डबे बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये बेंगळुरू भागलपूर एक्सप्रेस (१२२५३/१२२५४), छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (१२१३९/१२१४०) तसेच 12976/12975 जयपुर मैसूर सुपरफास्ट एक्सप्रेस,
17421/17422 तिरुपति कोल्लम एक्सप्रेस,आणि कोटा जंक्शन दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस (०९८१७/०९८१८) यांचा देखील समावेश आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)