पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी 28 जुलैला दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी " पत्रकार संवाद यात्रा " चे आयोजन (Organized " Journalist Samvad yatra " from Dikshabhumi to Mantralaya on July 28 for the right of justice of journalists)
नागपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई. च्या वतीने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, व न सुटलेल्या मागण्या सोडविण्यासाठी तसेच लोकशाहीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंत मुंडे साहेब यांचे नेतृत्वात दि.२८ जुलै २०२४ ला पवित्र दिक्षाभूमीतून या ऐतिहासीक पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ सर्व पत्रकार बांधवाच्या साक्षीने अपेक्षीत आहे. " पत्रकार संवाद यात्रा" दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय अशी निघत आहे. यात विवीध संघटना, राजकिय पक्ष यांच्या पाठिंब्याने या संवाद यात्रेला आपणास सफल करावयाचे आहे. तरी या यात्रेला चंद्रपूर /गडचिरोली / भंडारा/ गोंदिया/नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व जिल्हा/ तालुका/शाखा पदाधिकारी व सदस्यांनी दि.२८ जुलै २०२४ ला दिक्षाभूमी नागपूर येथे सकाळी ११ वाजता स्वयंप्रेरणेने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई. चे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या