इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित, 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत (Application Invited for Other Backward Bahujan Welfare Department Govt Hostel Admission, Application Deadline 21st July 2024

Vidyanshnewslive
By -
0
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित, 21जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत (Application Invited for Other Backward Bahujan Welfare Department Govt Hostel Admission, Application Deadline 21st July 2024)


चंद्रपूर :- शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चंद्रपूर जिल्हयामध्ये इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जातीभटक्या जमाती (VJNT), विशेष मागास प्रवर्ग (SBC) व आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह शासन निर्णय दिनांक १९ डिसेंबर, २०२३ अन्वये सुरु करण्यात आले आहे. यासाठी शासनाने भोजन, शैक्षणिक साहित्य, आरोग्य आदीसह सोयीसुविधा युक्त निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. सदर वसतीगृहात प्रवर्ग निहाय विहित आरक्षणानुसार व गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सदर वसतीगृह प्रवेशाकरीता सन २०२४-२५ या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच वसतीगृह प्रवेश सुलभ व्हावा, त्याच बरोबर वसतीगृहात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या द्ष्टीकोनातून वसतीगृहात प्रवेश घेण्याकरीता व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश वसतीगृह प्रवेशासाठी करण्यात येईल. उच्च शिक्षणासाठी वसतीगृहात प्रवेश घेण्याकरीता इयत्ता १२ वी मध्ये ६०टक्के किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन / CGPA चे गुण असणे आवश्यक राहील. तसेच उत्पन्न मर्यादा २.५० लाखापेक्षा कमी असावे व वय मर्यादा ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी मार्ग, चंद्रपूर यांच्याकडे 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज करणे अनिवार्य राहील. तरी सदर योजनेकरीता तात्काळ अर्ज सादर करण्यात यावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)