जनतेने कोणत्या विकासाला बघून मतदान करायचा? -रविभाऊ पुप्पलवार (What kind of development should the people vote for? - Ravi Bhau Puppalwar)

Vidyanshnewslive
By -
0
जनतेने कोणत्या विकासाला बघून मतदान करायचा? -रविभाऊ पुप्पलवार (What kind of development should the people vote for? - Ravi Bhau Puppalwar)
बल्लारपूर :- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मतदारसंघातील सरकारी शाळांची दयनीय अवस्था, सरकारी रुग्णालयातील गैरसोय, पिण्याच्या पाण्याची समस्या, 2019 पासून वीज खंडित असलेले बल्लारपूर शहरातील पशुवैद्यकीय रूग्णालय, थोडाश्या पावसाने देखील पाण्याने भरणारा गोल पुलिया, शहरातील नवीन रोडांची खराब अवस्था, वीज खांबांवरील गायब झालेले मोरपंख, वाढते प्रदुषण, शहरातील उद्योग धंद्यांची होत चाललेली अधोगती या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त बगिच्यांच्या आणि बसस्टॉप चा विकास बघून मतदान करायचा का? असा प्रश्न रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे. वीजेच्या युनिट चे वाढते दर, पाण्याचे अवाढव्य बील , बेरोजगारी, महागाई ने जनता त्रस्त असतांना फक्त बगीचे, बसस्टॉप व इमारती बांधणारा उमेदवार कोणत्या कामाचा? हा विकास कमिशनच्या वजणा खाली नाही का? यावर जनतेने नक्कीच विचार करायला पाहिजे असे देखील पुप्पलवार म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)