नागपूर :- सिगारेटवरून झालेल्या वादातून दोन तरुणींनी एका तरुणाची चाकू भोसकून हत्या केलीय. नागपूरमध्ये हडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी दोन तरुणींसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिगारेट ओढताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर राग मनात धरून तरुणींनी मित्राच्या मदतीने ही हत्या केलीय. घटना सीसीटीव्ही मध्येही कैद असून फुटेज व्हायरल झालं आहे. याबाबत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रणजीत बाबुलाल राठोड असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो कपडे विक्री आणि किराणा दुकान चालवण्याचे काम करायचा. शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजता पान टपरीवर सिगारेट घेतली. तेव्हा तिथे जयश्री पानझारे सुद्धा सिगारेट घेत होती. त्यावेळी रणजितने मागे वळून जयश्री कडे पाहिलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. रणजितने मागे वळून पाहताच जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला. यामुळे रागाने रणजितने तिला टोमणा मारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा जयश्री तिथून निघून गेली. मात्र थोड्या वेळाने सविता सायरे, आकाश राऊत आणि आणखी एक मित्र सोबत घेऊन जयश्री पान टपरी जवळ आली. तिथेच रणजितवर हल्ला करण्यात आला. रणजितवर चाकूने हल्ला करत सर्वजण पळून गेले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. रणजितला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, जयश्री सिगारेट घेताना शिवीगाळ करत होती तेव्हा रणजितने मोबाईलवर व्हिडीओ शूट केला होता. त्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास केला. तसंच सीसीटीव्ही फूटेजही तपासले गेले. आरोपींची ओळख पटल्यानंतर जयश्रीला ताब्यात घेतलं असून तिने इतर साथीदारांची नावेही सांगितली आहेत. याबाबत चा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments