बल्लारपूर :- देशात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र निवडणूकीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच दिनांक ३१ मार्च रोजी संत तुकाराम सभागृह बल्लारपूर येथे ओबीसी समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवार यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक पक्ष आणि उमेदवाराबद्दलच्या प्रतिक्रिया आणि मते जाणुन घेण्यात आली. प्रत्येक उमेदवारची कार्ये, त्यांची धोरणे, ओबीसी हितासाठी त्यांचे विचार अशा अनेक बाबींवर चिंतन करण्यात आले. सर्वांची मते संमिश्र प्रकारची आल्याने कुण्याही एका उमेदवाराला ठाम पाठिंबा देण्यासाठी एकमत झाले नाही. यामुळे कुणालाही पाठिंबा देण्यापेक्षा सध्या सदर विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरले. ओबीसी समितीची पुढिल बैठक समितीच्या संस्थापक अध्यक्षा ऍड अंजलीताई साळवे यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्याचा विचार बल्लारपूरचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांनी मांडला. यावेळी कुणीही ओबीसी समाजाला ग्राह्य धरण्याची चुक करु नये असाही इशारा देण्यात आला सदर बैठकीला एड प्रणय काकडे, केशव थिपे, शंकर काळे, साहिल घिवे, संकेत चौधरी, रोहित चुटे, चेतन पावडे, प्रतिक वाटेकर, अनिल वाग्दरकर सर, पोडे सर, माडेकर यांचेसह अनेक ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या