महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर ला नॅक चा B+(CGPA - 2.65)दर्जा बहाल (Mahatma Jyotiba Phule College Ballarpur Awarded NAAC Grade B+ (CGPA - 2.65)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर ला नॅक चा B+(CGPA - 2.65)दर्जा बहाल (Mahatma Jyotiba Phule College Ballarpur Awarded NAAC Grade B+ (CGPA - 2.65)
बल्लारपूर :- शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा व उपलब्ध सोई सुविधा याचे मूल्यांकन करण्याचे कार्य नॅक ही संस्था करीत असते. त्या अनुषंगाने बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात दि. 20 व 21 मार्च 2024 ला नॅक समितीने भेट दिली होती. या समितीत डॉ. किरण हजारिका (दिल्ली) डॉ. रंगप्पा के. बी. (कर्नाटक) आणि डॉ. नारायण प्रकाश(उत्तराखंड) हे होते.
       या दोन दिवसात समितीने महाविद्यालयात उपलब्ध सोई सुविधा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ई. ची पाहणी केली व त्या आधारे अहवाल तयार करून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण यांच्या स्वाधीन केला. या निकालाचे अवलोकन दि. 01 एप्रिल 2024 ला महाविद्यालयातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेशजी चिताडे, प्र.प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण, डॉ. रजत मंडल नॅक को-ऑर्डीनेटर ई. ची विचार मंचावर उपस्थिती होती. यावेळी सन्माननीय अतिथीच्या हस्ते अहवालाचे अवलोकन केले असता " *महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला नॅक समिती द्वारे B+ (CGPA - 2.65)"* दर्जा दिला असल्याचे स्पष्ट झाले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
             यावेळी मनोगत व्यक्त करतांना मा. संजयभाऊ कायरकर म्हणालेत की, महाविद्यालयाच्या विकासात व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत प्राध्यापकाचे उत्कृष्ट सहकार्य लाभले व भविष्यात असेच सहकार्य लाभावे अशी भावना व्यक्त केली. यावेळी 
अनेकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)