महाराष्ट्रातील 8 लोकसभा क्षेत्रासह देशभरातील 89 मतदारसंघात उद्या दुसऱ्या टप्प्याच मतदान (89 constituencies across the country including 8 Lok Sabha constituencies in Maharashtra will vote in the second phase tomorrow)
नागपूर :- देशात 18 व्या लोकसभा निवडणुकीला 19 एप्रिलला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान जवळपास 65 टक्के मतदान झालं. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार बेट, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी या भागात मतदान झालं. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार लोकसभेवर जातात. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, तिथे शाळा-कॉलेजेस बंद असतील. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, ई जिल्ह्यात उद्या मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात देशात एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदान होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या