जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया सुरु, निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज चंद्रपूर मतदारसंघात 19 हजार मतांचे मॉक पोल (In the presence of the District Collector, the process of preparing the machine has started, the voting machine is ready for the election. Mock poll of 19 thousand votes in Chandrapur Constituency.)
अशी असते प्रक्रिया ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएम चा डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.
जिल्हाधिका-यांच्या समक्ष प्रक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्वत: समेार मशीन तयार करण्याची प्रकिया करून घेतली. मशीनला व्यवस्थित सिलींग करणे जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच मॉक पोल होतांना व्हीव्हीपॅट काम करते की नाही, याची काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी रंजित यादव, सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या