धक्कादायक!साखरझोपेत असलेल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नागभीड येथील घटना (Shocking! Two daughters and wife who were in a drunken sleep were killed with an axe, an incident in Nagbhid)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक!साखरझोपेत असलेल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नागभीड येथील घटना  (Shocking! Two daughters and wife who were in a drunken sleep were killed with an axe, an incident in Nagbhid)
नागभीड :- कुटुंब प्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. ही थरारक घटना रविवारी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान नागभीड तालुक्यातील मौशी येथे घडली. या संदर्भात विश्वसनीय सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार अंबादास लक्ष्मण तलमले असे या निर्दयी कुटुंब प्रमुखाचे नाव आहे. अलका अंबादास तलमले (४२) पत्नीचे तर प्रणाली अंबादास तलमले (२२) आणि तेजस्वीनी अंबादास तलमले (२०) अशी मुलींची नावे आहेत. मुलगा अनिकेत (१८) हा पहाटे ४ वाजता कामासाठी घराबाहेर गेला होता, म्हणून तो वाचला, अशी माहिती आहे. सकाळी ही बाब उघड होताच गावकऱ्यांनी घरासमोर एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थली भेट दिली असून ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)