वृत्तसेवा :- पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी टाकू शकते. याच उदात्त उदाहरण म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या काळात रोहिणी नदीच्या पाण्याच्या कारणावरून शाक्य आणि कोलीय समुदायमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली व गौतमाचा या युद्धाला विरोध असल्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला होता आजही देशात कावेरी नदीच्या पाण्यावरून दोन राज्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा पाणी दुर्मिळ असते किंवा प्रदूषित असते, किंवा लोकांमध्ये असमानता असते किंवा प्रवेश नसतो तेव्हा समुदाय आणि देशांमध्ये तणाव वाढू शकतो. जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन साजरा करण्यास सुरूवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ-दि-जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या