धक्कादायक ! जन्मदाता मुलगाच ठरला आई-वडिलांच्या जीवाचा वैरी, कुऱ्हाडीने हल्ला करून आई ची हत्या केली तर वडील गंभीर जखमी, कोरपणा येथील घटना (Shocking! The biological son became the enemy of the parents, the mother was attacked with an ax and killed while the father was seriously injured, the incident at Korpana)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील लोणी येथील एका मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलाला एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना आज 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे 2 च्या सुमारास घडली आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहे.उपचारासाठी वडीलाला कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक आहे.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते आरोपी मुलांने एका खोलीत आई आणि वडीलाला बंद केले आणि अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने 4 आणि हातावर 2 वार करून आईला जागीच ठार केला तर वडीलाच्या डोक्यावर 2 वार करून त्याला गंभीर जखमी करून वहीनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपवून अंदरून दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला. मनोज पांडूरंग सातपुते वय वर्ष अंदाजे 45, असे आरोपी मुलाचे नाव असल्याचे कळते. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशातून यांच्यात हा वाद झाला आणि या वादातून सदर घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेनंतर आरोपी मुलाने तेथुन पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.आता याप्रकरणी पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)