चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन, नागरिकांनी सहभागी होण्याचं पोलीस अधिक्षकांनी केल आवाहन ("Nav Chaitanya" Police Festival organized by Chandrapur District Police, Superintendent of Police appeals to citizens to participate)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन “नव चैतन्य” पोलीस महोत्सवाचे आयोजन शनिवारी (दि. 24) पोलीस फुटबॉल ग्रॉऊन्ड ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर या ठिकाणी करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक मुमम्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांकरीता विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता “मी ब्रँड ॲम्बेसेडर ” या संकल्पनेतून चंद्रपूर पोलीस दलाकडून “नव चैतन्य” पोलीस महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले असुन सदर कार्यकमा अंतर्गत जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीसांचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवुन त्यांना पोलीस यंत्रणेची जवळून ओळख करुन देण्यास तसेच शासन आणि सुरक्षा यात सक्रिय भागीदार होण्यास मदत करेल. जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची माहिती, कायद्याचे समर्थन, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व सार्वजनिक सुव्यवस्था राखणे बाबतची माहिती स्वतः आणि आपल्या पाल्यांना करवून दयावी असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केला आहे. कायदा पाळणारा समाज घडविण्यात मोलाची भूमिका बजावतील. सामाजिकदृष्ट्या समर्पित आणि जबाबदार विद्यार्थ्यांची नवीन पिढी जोपासुन एक नव्या युगाची सुरुवात करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरीक, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, कोचींग क्लासेस प्रमुख यांना आवाहन करून स्वतः तसेच विद्यार्थ्यांना, पाल्यांना शनिवारी (24 फेब्रुवारी, 2024) सकाळी 10:00 वाजता ते सांयकाळी 06:00 वाजेच्या दरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन आयोजित “नव चैतन्य” पोलीस महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हान्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या