बल्लारपुरात तरुणीची निर्घृण हत्या, प्रेम प्रकरणातून खून केल्याचा संशय महाराणा प्रताप वॉर्डातील सम्यक चौकातील घटना (Brutal murder of a young woman in Ballarpur, suspected to be a love affair incident at Samyak Chowk in Maharana Pratap Ward)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वॉर्डातील सम्यक चौक परिसरातील एका तरुणीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याच प्रकरणातून आरोपीने तिची निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान महाराणा प्रताप वार्डातील सम्यक चौकात घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृतक तरुणीचे नाव रक्षा कुमरे (२२) रा. महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौक बल्लारपूर असे आहे. तर सिनू दहागावकर (२९) असे आरोपीचे नाव असून, तो घटनेनंतर फरार झाल्याची माहिती आहे. बल्लारपूर महाराणा प्रताप वार्ड, सम्यक चौकात येथील सिनू दहागावकर हा आई रामबाई सोबत राहत आहे. त्याची आई रामबाई ही शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घरी आली. त्यावेळी घरात एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. तिचा मुलगा सिनू हा पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. त्याने शुक्रवारी सायंकाळी रक्षा हिला स्वतःच्या घरी
बोलावून घेतले. रक्षा ही घरी आल्यावर सिनूच्या मनात वेगळाच कट होता. ती सिनुच्या घरी येताच प्रेमप्रकरणावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून सिनूने रक्षाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. आणि घरातून पळ काढला. ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरताच वार्डातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. त्याच दरम्यान बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक असिफराजा शेख पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत असून, रात्री उशिरापर्यंत मारेकऱ्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या