एसटीच्या ५१५० वातानुकूलित ई-बसेसचे मा. मुख्यमंत्र्याच्या हस्ते उ‌द्घाटन बोरीवली - ठाणे - नाशिक मार्गावर धावणार ई-बसेस... (5150 air-conditioned e-buses of ST. E-buses will run on the Borivali - Thane - Nashik route inaugurated by the Chief Minister...)

Vidyanshnewslive
By -
0
एसटीच्या ५१५० वातानुकूलित ई-बसेसचे मा. मुख्यमंत्र्याच्या हस्ते उ‌द्घाटन बोरीवली - ठाणे - नाशिक मार्गावर धावणार ई-बसेस... (5150 air-conditioned e-buses of ST. E-buses will run on the Borivali - Thane - Nashik route inaugurated by the Chief Minister...)
मुंबई :- प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई-बसेसचे लोकार्पण राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठाणे येथील खोपट बसस्थानकावरून होणार आहे. एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जीग स्थानके निर्माण केली जात आहेत. या प्रकल्पाची सुरूवात बोरीवली - ठाणे - नाशिक या मार्गावर या बसेस सुरू करून, करण्यात येत आहे.
        याचा लोकार्पण सोहळा मा. मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तथापी, ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस उद्या पासून बोरीवली - ठाणे - नाशिक या मार्गावर धावणार असून याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी (एशियाड) बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बस मध्ये महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. सदर बसेस आगाऊ आरक्षणासाठी www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App या मोबाईल आरक्षण अॅपवर उपलब्ध होणार आहेत. तरी, या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. अभिजीत भोसले जनसंपर्क अधिकारी एसटी महामंडळ यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत,  (विद्याश न्युज ), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)