बल्लारपूर - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस दररोज तर काजीपेठ - पुणे आठवड्यातुन 3 दिवस धावण्याची शक्यता, रेल्वेमंत्र्याची सकारात्मक भूमिका (Ballarpur - Mumbai Nandigram Express is possible to run daily and Kazipet - Pune 3 days a week, sources informed that Railway Minister has taken a positive stance.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर येथून मुंबई व पुणे शहरासाठी थेट रेल्वे नसल्याने विद्यार्थी व व्यावसायिकांना अडचणी येतात. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बल्लारशा येथून मुंबई व पुणेसाठी रेल्वे सुरु करण्यास सकारात्मक भूमिका घेतली. मध्य रेल्वे विभागाने यासंदर्भात सोमवारी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र जारी करून रेल्वे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता टिपण सादर करण्याचे कळविले आहे. मध्य रेल्वे विभागाने नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना चंद्रपूर- मुंबई व पुणे शहरासाठी थेट गाडीबाबत पत्र दिले. या पत्रानुसार, अंतिम निर्णय झाल्यास बल्लारशाह येथून मुंबईसाठी दररोज तर पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. काझीपेठ पुणे क्र. २२१५१/५२ बल्लारशा येथून सुरू करावी तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वे क्र. ११४०१/०२ ही मुंबई येथून आदिलाबादपर्यंत येत असताना रेल्वेचे विस्तारीकरण करून बल्लारशाह पर्यंत आणल्यास जिल्ह्यातील नागरिकांची अडचण दूर होऊ शकते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)