वनरक्षक भरती प्रक्रिया धाव चाचणीच्या अनुषंगाने बल्लारपूर - पोंभुर्णा - चिंचपल्ली - जुनोना मार्ग 20 फरवरीला वाहतुकी साठी बंद - वनपरीक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह (Ballarpur - Pombhurna - Chinchappalli - Junona road closed for traffic on February 20 in pursuance of forest guard recruitment process run test - Forest Range Officer, Ballarshah)
बल्लारपूर - वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 मध्ये धाव चाचणी व ऑनलाईन परिक्षेमध्ये मिळालेले गुण एकत्रीत करुन गुणवत्तेप्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवाराची 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 कि.मी. व महिला उमेदवारांना 16 कि.मी. चालण्याची शारीरीक क्षमता चाचणी दिनांक 20.02.2024 ला सकाळी 5.45 वाजता कारवा सफारी गेट, कारवा येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. करीता दिनांक 20.02.2024 ला सकाळी 5.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत (1) बल्हारशाह ते जुनोना मार्ग, 2) पोंभुर्णा ते जुनोना मार्ग व 3) चिचपल्ली ते जुनोना मार्ग वाहतुकी करीता पुर्णता बंद राहणार आहे. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या