10 वी व 12 वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू (Section 144 applicable in the background of 10th and 12th examination, at the place of examination center)

Vidyanshnewslive
By -
0
10 वी व 12 वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू (Section 144 applicable in the background of 10th and 12th examination, at the place of examination center)
चंद्रपूर :- जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी)दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) दि. 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील. हा आदेश उच्च माध्यमिक  प्रमाणपत्र परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)