बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज 30 जानेवारी " हुतात्मा दिन " निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली. महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाद्वारे अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. रोशन फुलकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे ई ची विचार पिठावर उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवर अतिथीच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करण्यात आले. तदनंतर प्रास्ताविकेतून डॉ. किशोर चौरे यांनी महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला गांधीजीचे कार्य व विचाराचे महत्व विषद केले. यानंतर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना म्हणाले की, " या देशात 3 विचारधारा महत्वपूर्ण होत्या ज्यांनी समता, मानवी मूल्य रुजविण्याचा प्रयत्न केला त्यात तथागत बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची विचारधारा जगात पसरली असून अवघ्या जगाने या विचारधारा स्विकारल्यात.
महात्मा गांधीजीचे सत्य, अहिंसा व स्वदेशी ची संकल्पना व गांधीजींचे सत्याग्रह आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीस महत्वपूर्ण योगदान आहे एकूणच महात्मा गांधी ही एक व्यक्ती नसून विचारधारा होय. " असे मत डॉ. बादलशाह चव्हाण यांनी व्यक्त केले. या अभिवादन पर कार्यक्रमाला डॉ. विनय कवाडे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments