महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार दिन ' मतदानाविषयीं जनजागृती करून साजरा (Mahatma Jyotiba Phule College celebrated 'National Voter's Day' by creating awareness about voting)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमान 'राष्ट्रीय मतदार दिनाचा ' कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. किशोर चौरे, डॉ. रजत मंडल, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, ई ची विचार मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली यावेळी मार्गदर्शन करतांना प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की " मतदानाचा अधिकार देतांना पूर्वी नियमित कर भरणारे व सुशिक्षित मतदारांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे असे काहीचे मत होते मात्र भारताची घटना तयार करतांना घटनाकारांनी भारतीय घटनेत वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना प्रोढ मतदानाचा अधिकार प्राप्त झाला तसेच प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले मूलभूत व नैतिक कर्तव्य समजून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, मतदान करतांना योग्य उमेदवारांची निवड करावी ज्यामुळे आपल्या देशाची लोकशाही मजबूत होण्याकरिता बळ प्राप्त होईल व लोकशाही टिकून राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोहनीश माकोडे, तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. दिपक भगत यांनी केले. याप्रसंगी प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी " प्रत्येक भारतीय नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा कायम ठेवण्याची व निष्पक्षपाती व निर्भयतेने मतदानाचा हक्क पार पाडण्याची शपथ दिली. यावेळी प्रा. डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, ले. योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments