भद्रावती येथील ऐतिहासिक बुध्द लेणी परिसरातील बुध्द मूर्तीची विटंबना Desecration of the Buddha statue in the historic Buddha cave area of ​​bhadravati

Vidyanshnewslive
By -
0
भद्रावती येथील ऐतिहासिक बुध्द लेणी परिसरातील बुध्द मूर्तीची विटंबना Desecration of the Buddha statue in the historic Buddha cave area of ​​bhadravati 
भद्रावती :- भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना दिनांक 1 जानेवारीला सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली. सदर घटनेनी संतप्त झालेल्या शहरातील बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील बौद्ध बांधव सुद्धा घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर भद्रावती शहरातील नाग मंदिरापासून निषेध मोर्चा काढून शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बौद्ध बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निषेध मोर्चात शहरातील बौद्ध बांधव तथा महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. याबाबत भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान बुद्धाची ऐतिहासिक मूर्ती होती. टेकडीवर हा मूर्ती असल्याने ती सहजपणे दिसायची. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना ही मूर्ती न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता या मूर्तीची तोडफोड झाल्याची आढळून आले. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)