एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात शालेय उपक्रम (A day in nature school activities)

Vidyanshnewslive
By -
0
एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात शालेय उपक्रम (A day in nature school activities)
वृत्तसेवा :- शालेय उपक्रमातून विद्यार्थ्याना ज्ञान आत्मसात व्हावे या उद्देशाने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम, शाळा सल्लागार समितीचे सदस्य गिताचार्य सुखदेव चौथाले, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा इंदुताई मडावी व सर्व समितीचे सदस्याच्या उपस्थितीत  हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाच्या माध्यमातून मूल तालुक्यातील आकापुर येथील असेलल्या शेततळे व पोर्ट्री फार्मला विद्यार्थ्यांनी भेट देवुन मत्स्य व पोर्ट्री व्यवसायाबाबत माहिती जाणुन घेतली. त्यांनतर जवळच असलेल्या उमा नदीला भेट देवुन शैक्षणिक अभ्यासक्रमातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न यावेळी विद्यार्थ्यांनी केला. निसर्ग आपल्याला भरभरून देतो त्यांचे जतन व संगोपन करण्याची जबाबदारी भावी पिढीवर असल्याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांनतर आकापुर येथील दत्त मंदिर परिसरात विद्यार्थ्यासाठी वन भोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व मान्यवरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, बंडू अल्लीवार, अजय राऊत, रिना मसराम आदींनी विद्यार्थ्यानी विविध सांघिक खेळातून मनोरंजन केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)