प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची १११ वी जयंती साजरी. पत्रकार दिनानिमित्त स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन (Acharya Balshastri Jambhekar's birth anniversary celebration by Regional Youth Journalist Union Ballarpur. Organizing a friendly program on the occasion of Journalist's Day)

Vidyanshnewslive
By -
0
प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची १११ वी जयंती साजरी. पत्रकार दिनानिमित्त स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन (Acharya Balshastri Jambhekar's birth anniversary celebration by Regional Youth Journalist Union Ballarpur.  Organizing a friendly program on the occasion of Journalist's Day)
बल्लारपुर :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त दिनांक ०६/०१/२०२४ शनिवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रादेशिक युवा पत्रकार संघातर्फे पी डब्ल्यू डी विश्रामगृह येथे पत्रकार बांधवांसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र आर्य अध्यक्ष प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूर यांच्यासह देवेंद्र आर्य  काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी, समीर केणे माजी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, भाजपचे माजी अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, शहराध्यक्ष भाजप काशिनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला पुष्प अर्पण केले. यावेळी प्रमुख पाहुणे चंदनसिंह चंदेल म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केवळ 34 वर्षांच्या आयुष्यात पत्रकारितेत मोठे योगदान दिले, त्यामुळेच ते पत्रकारितेच्या क्षेत्रात अमर झाले ते पुढे म्हणाले की बल्लारपूर शहरात लवकरच पत्रकार भवन बांधले जाणार असल्याचेही सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र आर्य म्हणाले की, प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरची स्थापना वर्षभरापूर्वी झाली असून या संघटनेत केवळ प्रादेशिक वृत्तपत्राच्या पत्रकारांनाच सदस्य करण्यात आले असून बल्लारपुर तालुका चे ग्रामीण भागातील पत्रकार (विसापूर, नांदगाव, कोठारी व पडसगाव) या पत्रकारांनाही संघाचे सदस्य करण्यात आले असून आगामी काळात बल्लारपूर तालुक्यातील प्रादेशिक वृत्तपत्रांच्या अधिकाधिक पत्रकारांचा संघात समावेश करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरचे सचिव सुभाष भटवलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरचे कोषाध्यक्ष घनश्याम बुरडकर यांनी केले.
       यावेळी पत्रकार व्ही.श्रीनिवास, मंगेश बेले, नरेश मुंधडा, प्रशांत वैरागडे, नारदा प्रसाद, अनिल पांडे, राकेश कांबडे, विक्की दुपारे, मनोहर दोतपेल्ली, दिपक भगत, राहुल गायकवाड, सुजय वाघमारे, गणेश रहिकवार, शंकर महाकाली, प्रकाश  दोतपेल्ली, देवानंद देशभ्रतार, धनंजय पांढरे आदी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीची घोषणा प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरची तीन वर्षीय सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्ष ज्ञानेंद्र आर्य (तालुका प्रतिनिधी नवराष्ट्र), उपाध्यक्ष प्रशांत भोरे (तालुका प्रतिनिधी द हितवादा), सचिव सुभाष भटवळकर (लोकमत विसापूर), कोषाध्यक्ष घनश्याम बुरडकर (तालुका प्रतिनिधी लोकमत समाचार), सहसचिव विवेक गडकर, प्रमोद येरावार (लोकमत कोठारी) आशिष खाडे (लोकमत पडसगाव), वैभव मेश्राम. (पुण्य नगरी विसापूर) या मध्ये समाविष्ट आहे. तसेच प्रादेशिक युवा पत्रकार संघ बल्लारपूरचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व माजी लोकमत शहर प्रतिनिधी अनेकश्वर मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)