प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकडून 80 लष्करी जवानांना शोर्य पुरस्कार जाहीर, प्रजासत्ताक दिनी सन्मानित होणार (President Draupadi Murmu announces Shorya Award to 80 army personnel on the occasion of Republic Day, to be honored on Republic Day)

Vidyanshnewslive
By -
0
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकडून 80 लष्करी जवानांना शोर्य पुरस्कार जाहीर, प्रजासत्ताक दिनी सन्मानित होणार (President Draupadi Murmu announces Shorya Award to 80 army personnel on the occasion of Republic Day, to be honored on Republic Day)
वृत्तसेवा :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. ८० लष्करी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यातील १२ जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार दिली जातील. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला देश वासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला, तसेच कर्पूरी ठाकूर यांना देखील श्रद्धांजली वाहिली. देशवासियांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ वा प्रजासत्ताक दिवस हा ऐतिहासिक पल्ला आहे. हे एक युगप्रवर्तक कालखंड आहे. आज आपल्या मूलभूत सिद्धांतांना आठवण करण्याचा योग्य क्षण आहे, असं त्या म्हणाल्या. सहा जणांना किर्ती चक्रा देण्यात आले आहे, त्यातील तिघांना तो मरणोत्तर देण्यात आला. १६ शौर्य चक्रा पुरस्कार, त्यातील दोघांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला. ५३ लष्करी कर्मचाऱ्यांना सेना मेडल्स देण्यात आलेत, त्यातील सात जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. नाव सेना मेडल आणि चार वायु सेना मेडल देण्यात आले आहेत. आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेशी एकजूट होऊन १४० कोटी भारतीय एका कुटुंबाप्रमाणे राहत आहेत. जगातील सर्वात मोठे हे कुटुंब असून यात सह अस्तित्वाची भावना, सामूहिक उत्साह आहे, असंही त्या म्हणाल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)