महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, संविधानाच्या प्रास्ताविकेच वाचन करण्यात आले (75th Republic Day was celebrated in Mahatma Jyotiba Phule College with enthusiasm, the Preamble of the Constitution was read.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, संविधानाच्या प्रास्ताविकेच वाचन करण्यात आले (75th Republic Day was celebrated in Mahatma Jyotiba Phule College with enthusiasm, the Preamble of the Constitution was read.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताकाचा 75 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बल्लारपूर शहरातील अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन पार पडले महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेशजी चिताडे, सदस्य अजयभाऊ कायरकर प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, एन. सी. सी विभाग प्रमुख ले. योगेश टेकाडे ई ची मंचावर उपस्थिती होती.
          75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व एनसीसी गीत सादर करण्यात आले यानंतर एनसीसीच्या 108 कॅडेटच्या वतीने अतिथीना मानवंदना देण्यात आली तसेच रायफल द्वारे मार्च पास्ट व परेड सादर करण्यात आली यानंतर मागील वर्षभरात विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या कॅडेट व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच मागील 3 वर्षाच्या काळात महाविद्यालयाचे 25 ते 30 विद्यार्थी भारतीय सैन्यात देशसेवा करीत असल्याची माहिती आहे.
              विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत मराठी विषयातून कु. जयश्री अशोकराव ताजने व अर्थशास्त्र विभागातून कु. करिश्मा शत्रुघ्न मिलमिले गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ कायरकर यांच्या हस्ते गुणवंताचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच एकलव्य ज्ञान वर्धिनी अंतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धात यश प्राप्त करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
                 यावेळी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " प्रजासत्ताक दिन साजरा करतांना घटनाकारांच्या अथक कष्टाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अखंड प्रयत्नांना सर्व भारतीयांनी सन्मान केला पाहिजे आपल्या हक्क व अधिकाराविषयीं जागृत असले पाहिजे तसेच आपल्या मतदानाचा अधिकार बजावताना योग्य व जनतेसाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तीला आपल मत दिल पाहिजे तसेच प्रत्येकाने आपल्या मतदानाच्या अधिकारांचा वापर केला पाहिजे. घटना समितीत 7 सदस्य असतांना सुध्दा संविधान तयार करण्याची जबाबदारी एकट्या बाबासाहेबांनी पार पाडली व आपले कर्तव्य पार पाडताना देश प्रथम ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवली असल्याच मत व्यक्त केल. " या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)