प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रलंबित अनुदान लवकर मिळावे भाजप कामगार मोर्चातर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले (A statement was given to the Chief Executive by the BJP Workers' Morcha to get the pending grant of Pradhan Mantri Awas Yojana soon)
बल्लारपूर :- भाजप कामगार मोर्चातर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाबाबत भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे यांनी मुख्याधिकारी श्री.विशाल वाघ यांची भेट घेऊन चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कामगार नेते भास्कर पेंदोर उपस्थित होते. मुख्याधिकारी म्हणाले की, मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार सुरू झाला आहे. काही अनुदान आले आहे,काही महिनाभरात मिळणे अपेक्षित आहे.मिळाताच देयके दिली जातील वास्तविक, बल्लारपूरमधील अनेक नागरिकांची घरे सन 2019 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना 5 ऑगस्ट 2019 रोजी नगरपरिषदेमार्फत घरे बांधण्याची परवानगी देण्यात आली होती आणि बांधकामाला सुरुवातही करण्यात आली होती. पहिला हप्ता 1 ऑगस्ट 2019 रोजी देण्यात आला होता. 60,000 रुपये दिल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांना शासनाकडून उर्वरित हप्ता मिळालेला नाही. या काळात कोणाचे घर अपूर्ण आहे तर कोणी कर्ज घेऊन बांधकाम पूर्ण केले आहे. कोणी भाड्याच्या खोलीत राहत असल्याने सर्वांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांची दैना झाली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या