बल्लारशाह वनपरीक्षेत्र कार्यालया अंतर्गत इटोलीत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम (Awareness program to prevent human-wildlife conflict in Etoli under Ballarshah Forest Zone Office)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह वनपरीक्षेत्र कार्यालया अंतर्गत इटोलीत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम (Awareness program to prevent human-wildlife conflict in Etoli under Ballarshah Forest Zone Office)
बल्लारपूर :- मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथे दिनांक 22 डिसेंबर 2023 ला मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने गावातील नागरीकांना मानव - वन्यप्राणी संघर्ष टाळण्याकरीता चित्रफीत व्दारे जनजागृती करणे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यात गावातील नागरीकांनी शेतात कामे करतांना घ्यावयाची काळजी, गुरांचे वन्यप्राण्यापासुन बचाव करणे व वन्यप्राणी वावर वनातील क्षेत्रात प्रवेश करु नये याबाबत चित्रफीत व्दारे गावात जनजागृती करण्यात आली. अशा प्रकारच्या जनजागृती मुळे मानव वन्यजीव संर्घ कमी होण्यास निश्चित मदत मिळेल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे, ग्राम पंचायत इटोली चे सरपंच श्री.तुळशीदास पिपरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नागेश दुधबळे, उपाध्यक्ष श्री. दयालवार व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)