बल्लारपूर :- येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात बरेच वर्षे प्राध्यापक राहिलेले व सध्या नागपूर जिल्ह्यातील स्व. आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. विजय सोरते यांच्या "मी : एक अंधारटिंब "या कवितासंग्रहाला वर्धा येथील देवकाई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कवितासंग्रह स्पर्धेत 2023 देवकाई प्रोत्साहनपर काव्यपुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 24 डिसेंबरला वर्धा येथे आयोजित केलेल्या समारंभात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे संयोजक प्रकाश बनसोडे यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या