स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक, ९ दुचाकी सहित ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त Action of local crime branch, three bike thieves arrested, including 9 bikes worth Rs 5 lakh seized

Vidyanshnewslive
By -
0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक, ९ दुचाकी सहित ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त Action of local crime branch, three bike thieves arrested, including 9 bikes worth Rs 5 lakh seized

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने तीन वाहन चोरांना अटक करून ९ दुचाकी सहित पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. जिल्ह्यातील दुचाकी चोरीची घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी निर्देशांची अंमलबजावणी करीत विशेष पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ त्याठिकाणी पोहचत दोघांना ताब्यात घेतले. अक्षय भलमे (२४) वर्ष,  मंगेश मडावी (१९) वर्ष रा. आष्टी जि. गडचिरोली व सोबत असलेला रोहित लोनगाडगे (१९) वर्ष रा. नांदाफाटा जि. चंद्रपूर यांची चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबूल केले. सदर पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे तपासली, गोपनीय बातमीदार नेमले, यावेळी पथकास गोपनीय माहिती मिळाली की २ इसम हे विना कागदपत्रांची व विना नंबरची मोटारसायकल विक्री करीता कामगार चौक, बायपास रोड येथे फिरत आहे. आरोपी जवळून राजुरा, बल्लारशाह, कुरखेडा, आष्टी, मुलचेरा, गडचांदूर अश्या एकूण ९ दुचाकी सहित पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे, सीसीटीएनएस चे गोपाळ पिंपलशेंडे, व सायबर पथकाने केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)